spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

शबनम न्यूज, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेला दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुरस्कृत राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था म्हणून या पतसंस्थेला हा बहुमान सलग पाचव्यांदा देण्यात आला.

गोकर्ण, महाबळेश्वर, कर्नाटक येथे कर्नाटक राज्याचे खासदार प्रभाकर कोरे, अण्णासाहेब जोले व आमदार शशिकला जोले यांच्या उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयते यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

पतसंस्थेचा हा पुरस्कार संस्थेचे मार्गदर्शक तथा तज्ञ संचालक शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्यासह चेअरमन शिवाजी येळवंडे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर शिंदे, सेक्रेटरी विश्वनाथ लांडगे व खजिनदार अभिषेक फुगे यांनी स्वीकारला.

यावेळी संस्थेची संचालक चारुशीला जोशी, सनी कदम, नथा मातेरे ,विजया कांबळे, योगेश रानवडे, विजय मुंडे, वैभव देवकर, युनूस पगडीवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेला शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनात संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्यामुळे सलग पाचव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्व संचालक मंडळ, सल्लागार, सभासद यांचे बबनराव झिंजुर्डे यांनी अभिनंदन केले व मनापासून आभार व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!