spot_img
spot_img
spot_img

दिवाळी काळात भोसरी एमआयडीसीत पोलिस गस्त वाढवा – अभय भोर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी एमआयडीसी परिसर हा सर्वात मोठा औद्योगिक पट्टा असून दिवाळी काळात आठवडाभर कंपन्या बंद असतात या सुट्टीदरम्यान सामूहिक गटांद्वारे परिसरातील कंपन्यांमध्ये चोऱ्या, अवैध धंदे, दारूधुंद टोळ्यांचे अड्डे, सुरक्षारक्षकांवर हल्ले आणि कामगारांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतात अवैद्य वाहने रात्रीच्या वेळी उभे राहणे त्यामध्ये गैरकृत्य चालू असतात तसेच कामगारांना या काळात दिवाळी बोनस मिळाल्याने त्यांच्या हातात रोख रक्कम असते, आणि त्याच काळात काही टोळ्या मोबाईल व पैशांची लूट, जबरदस्तीने अडवणे असे प्रकार करतात. त्यामुळे कामगारांच्या व उद्योग क्षेत्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि उद्योग परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांकडे प्रसिद्धी पत्राद्वारे आणि आयुक्तालयात पत्र पाठवून मागणी केली आहे

अभय भोर म्हणाले, भोसरी एमआयडीसी हे महाराष्ट्राचे औद्योगिक हब आहे संपूर्ण परिसरात सहा ते सात हजार कंपन्या असून अंतर्गत रस्ते 76 किलोमीटर आहेत 3500 एकर वर वसलेल्या या औद्योगिक क्षेत्रात परराज्यातील अनेक लोकांचा वावर असतो सुट्टीच्या काळातही आईनेगैरकृत्य एमआयडीसी परिसरात घडताना दिसतात विशेषता रात्रीच्या वेळी एमआयडीसी मधून प्रवास करण्यास अनेक जण टाळतात.पोलिसांनी तातडीने गस्त वाढवली
तसेच त्यांनी शासन व पोलिस प्रशासनाला विनंती केली या काळात सीसी कॅमेरा नियंत्रण कक्ष स्वतंत्र सुरक्षाग्रस्त पथके यामध्ये वाढ करून एमआयडीसी मधील ग्रस्त वाढविणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!