spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.

       आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

          आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ६१११४२ आणि १० अशा एकूण ६८ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

यावेळी नागरिकांनी  दसऱ्यानिमित्त शहरात अवैद्य पद्धतीने लावलेले बॅनर काढणेनिगडी ते मोरवाडी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सोडविणेदिवाळी निमित्त शहरात शहरात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणेनाशिक फाटा येथे नागरिकांच्या सोयीसाठी खाजगी बस थांबा निर्माण करणेशहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणेउद्यानातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करणेआदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

या उपक्रमामुळे नागरिकांच्या सहभागातून प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार होईलतसेच शहरातील नागरी सुविधांच्या उन्नतीस गती मिळेलअसा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!