spot_img
spot_img
spot_img

कचरा गोळा करणाऱ्या कॉम्पॅक्टर गाडी ची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरात देहूरोड परिसरात एका कचरा गोळा करणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या कॉम्पॅक्टर गाडीने धडक दिल्याने 65 वर्षीय अशोक सुदाम जाधव यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास सदर घटना घडली. देहूरोड साईनगर परिसरात कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या कॉम्पॅक्टर गाडी (MH14 KQ.8772 )ची धडक बसून अशोक सुदाम हे खाली पडले त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला त्यांचे डोके या वाहनाच्या पुढील चाकाच्या खाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत सागर अशोक जाधव यांनी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता गाडी चालक बाळासाहेब गोकुळ गायकवाड वय 38 राहणार, निगडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून .देहू रोड पोलीस अधिक तपास करीत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!