शहराध्यक्ष शत्रुघ्नकाटे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला, स्वदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी भारतीयांना प्रेरित केले, या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात यंदाच्या दिवाळी करिता नागरिकांनी स्वदेशी वस्तू खरेदी कराव्या असा संदेश शहर भाजप वतीने देण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्राधिकरण चिंचवड मंडळ अध्यक्ष जयदीप खापरे व महिला मोर्चा प्राधिकरण चिंचवड मंडल च्या अध्यक्ष नीताताई कुशारे यांच्या पुढाकाराने दिवाळी उत्सव स्वदेशी वस्तूंची विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्नकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे,सदाशिव खाडे, वैशाली खाडे, मधुकर बच्चे, सीमा चव्हाण, मोरेश्वर शेडगे यांच्या सह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रदर्शन दिनांक 12 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथेसुरू राहणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
या स्वदेशी वस्तूंच्या विक्री व खरेदी प्रदर्शनात खास दिवाळीसाठी स्टॉल लावण्यात आली. यामध्ये विविध खाद्यपदार्थ, पारंपारिक वस्त्र व हस्तकलेने तयार करण्यात आलेले बरेच वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. हाताने बनवलेली दिवाळीसाठीची सजावट साहित्यासह लहान मुलांसाठी विविध खेळणी ही येथे पहावयास मिळत आहे.