शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या निमित्ताने प्राधिकरण चिंचवड मंडळ अध्यक्ष जयदीप उमा गिरीश खापरे व प्राधिकरण चिंचवड मंडल महिला मोर्चा अध्यक्ष नीताताई कुशारे यांच्या वतीने दिवाळी उत्सव स्वदेशी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री या २ दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक जयदीप गिरीश खापरे यांनी दिली.
सदर प्रदर्शनात हाताने बनवलेली दिवाळी सजावट वस्तू, पारंपारिक गोडधोड आणि नमकीन पदार्थ, आकर्षक पारंपारिक कपडे आणि ॲक्सेसरीज, मेहंदी दिवे रंगवणे खेळ आणि मुलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन 12 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबर या दोन दिवस सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड प्राधिकरण येथे संपन्न होणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून यावेळी आमदार उमा खापरे ,आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस ,माजी उपमहापौर तुषार हिंगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, सरचिटणीस वैशाली खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या दिवाळी उत्सव स्वदेशी वस्तूंचे भव्य प्रदर्शनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.