शबनम न्यूज | पुणे
पुणे अभियांत्रिक प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यबद्दल खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांना नुकतेच वर्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
जागतिक संसद व जागतिक संघ या संघटनेच्या महाराष्ट्र चॅण्टरच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील विश्रामगृहात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक व निर्माते प्रदीप गोगटे यांच्या हस्ते पांडुरंग शेलार यांना शाल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दत्ता विधावे, नितीन दिनकर, सौ गायत्री मस्के, सुनील सकट, सतीश अहिरे, इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते, यावेळी बोलताना इंजिनियर पांडुरंग शेलार म्हणाले समाजातील वैशिष्ट्यपूर्व काम करणाऱ्या लोकांचा सन्मान ही संस्था करीत असल्याने अनेक लोक प्रेरणा घेऊन समाजाला मदत करतील त्यामुळे या संस्थेचे कार्य अतिशय समाज उपयोगी असल्याने तसेच देशात 40 ते 50 टक्के युवकांची शक्ती आहे त्यात त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शासनाला करावे लागणार आहे त्यांना योग्य प्रवाहात आणले तर त्याचा फायदा देशाचा विकासावर चांगला होणार आहे, असे मत इंजिनियर पांडुरंग शेलार यांनी व्यक्त केले.