शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील महाराणा प्रताप उद्यानाजवळ तरुणावर तीन जणांनी वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयंक खरारे असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत इंगळे व त्याचा मित्र मयंक खरारे हे त्यांच्या दुचाकीवरून महाराणा प्रताप उद्यानाजवळून जात होते. त्यावेळी उद्यानाच्या जवळ दखनी मिसळच्या समोर अचानक त्यांच्यावर तीन जणांनी हल्ला केला. हे तिघे जनता मास्क लावून त्यांच्या पाठीमागून आले. त्यांनी मयंकच्या डोक्यावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तिघेही जनता वसाहत मधील असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील बाजीराव रोड परिसरात आज दुपारी ३.१५ वाजता ही घटना घडली आहे. एका तरुणावर एका दुचाकीवरून आलेले २ ते ३ जणांनी हल्ला करत त्याचा खून केला आहे. हा सगळा प्रकार पूर्व वैमनस्यातून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.एका दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन तरुणांनी कोयता आणि कुखरी या हत्याराने एकावर हल्ला केला आणि यात त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले यांनी दिली आहे.




