spot_img
spot_img
spot_img

नाना काटे सोशल फाउंडेशन व उत्तर भारतीय नागरिक यांच्या वतीने छटपूजा उत्सव संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी दि २७ व २८ नोव्हेंबर रोजी पिंपळे  सौदागर येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने महादेव मंदिरा शेजारील पवना नदी घाटावर छट पूजेचे  आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी छट पूजेसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्या कडून  नदी घाटाची साफ सफाई करण्यात आली.

 उत्तर भारतीयांच्या दृष्टीने छट पूजा म्हणजे धरणी माता व सूर्य भगवानची पूजा आहे. विवाहित महिला आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी तीन दिवस निरंकार उपवास ठेवून वृत ठेवतात.सूर्याला देव मानून संध्याकाळी दीपक व जास्तीत जास्त सर्व प्रकारचे फळे अर्पण करून सूर्य देवाची आराधना केली जाते.दुसरे दिवशी पहाटे ४ वाजता तोच दिवा व फळे नदी मध्ये उभे राहून सूर्योदयाची वाट पाहिली जाते.व सूर्य देवाची उपासना केली जाते.यानंतर सूर्य देवाच्या नावाने पुरोहिताच्या मंत्रोच्चाराने नदीमध्ये दुध अर्पण केले जाते. यानंतर एकमेकांना फळ व प्रसाद वाटला जातो.या मधून एकमेकाविषयी आनंद व आदर व्यक्त करतात. अशा या छट पूजेचे आयोजन पिंपळे सौदागर येथे  आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा  उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी मा.नगरसेवक विलास पाडाळे,युवा नेते उमेश काटे, सोनिगरा ज्वेलर्सचे प्रोप्रा.दिलीप  सोनिगरा,जितेंद्र सोनिगरा  तसेच आयोजक ब्रिजेश सिंह,दुर्गेश कुमार सिंह ,राकेश गुप्ता  विनयकुमार गुप्ता ,विजय चौहान,अमरजीत सिंह,मानसिंह,विजय बहादूर प्रजापती,अजय कुमार गुप्ता,जनार्दन सिंह व  उत्तर भारतीय नागरिक   मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!